ब्राऊन शुगर विक्री करणाऱ्या तरुण पोलिसांच्या जाळ्यात
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या दुचाकी पार्किंग झोनमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने उभा असलेला तरुण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून २१ हजाराचा ब्राऊन हेरॉइन पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दूल रऊफ इक्बाल डोगरकर (रा. कर्ला, रत्नागिरी) असे संशयिचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १) दुपारी एक च्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रत्नागिरी शहर परिसरातील माळनाका, -नाचणेरोड, कुवारबा अशी गस्ती घालत असताना रेल्वेस्टेशन रत्नागिरी येथील दुचाकी पार्कींग येथे संशयित अब्दूल डोंगरकर हा एका पारदर्शक प्लिस्टिक पिशवी त्यामध्ये ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉन सदृश्य अंमली पदार्थ घेऊन विक्रीच्या उद्देशाने उभा होता. त्याची चौकशी केली असता त्याच्या २१ हजार रुपयांचा अंमली पदार्थ सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल विवेक रसाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.