प्रतिपंढरपूर रत्नागिरी बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी सोहळा उत्साहात
श्री. जितेंद्र व सौ. राधिका जोशी यांना पूजेचा मान
रत्नागिरी: प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील प्रसिद्ध बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
या पावन प्रसंगी मंदिरातील मुख्य महापूजेचा मान जितेंद्र जोशी व सौ. राधिका जोशी या दाम्पत्याला मिळाला. भाविकांच्या उपस्थितीत आणि विठूरायाच्या गजरात त्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची यथोचित सांगोपांग पूजा व आरती संपन्न केली.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासूनच विठ्ठलमंदिरात भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा तुकाराम’च्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन कृतार्थता व्यक्त केली.