चिपळुणात कारला दुचाकीची धडक
चिपळूण : दारुच्या नशेत दुचाकी भरधाव वेगात चालवून शासकीय कारला धडक देऊन अपघात केल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथे घडली. याप्रकरणी उमेर गणी कुरेशी (५२, खेर्डी) याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद तेजस तानाजी कोकरे (३६, रत्नागिरी) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस कोकरे हे शासकीय कारने मंडणगड ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. यावेळी ते मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना ते चिपळूण-वालोंपे येथे आले असता त्याचवेळी उमेर कुरेशी याने दारुच्या नशेत रस्त्याच्या विशिष्ठ परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन दुचाकीने भरधाव वेगाने चालवून कारला धडक दिली. यात कारचे नुकसान झाले आहे.