
चिपळूणात बेकायदा जुगार चालवणाऱ्यावर कारवाईचा बडगा
चिपळूणः-शहरातील बहादूरशेख नाक्यासह अलोरे येथे बेकायदा जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना शुकवारी घडली.
राजू सीताराम कलकुटकी (52, बहादूरशेख नाका), मंगेश विठ्ठल मोहिते (49, पेढांबे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद सुकन्या विनोद आंबेरकर, दिलीप धोंडीराम पवार यांनी दिली. शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे बंद दुकानाच्या अडोशाला राजू कलकुटकी हा बेकायदा कल्याण मटका जुगाराचे साहित्य जवळ बाळगून लोकांकडून पैसे स्वीकारुन जुगार खेळ चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली असून 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मंगेश मोहिते हा अलोरे साई मंदिराच्या पाठीमागील बाजूस भिंतीच्या आडोशाला बेकायदा मटका जुगार चालवत होता. या प्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली असून 352 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.