
राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात
मुंबई :राज्यात आजपासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात होत आहे. यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा देणार आहेत. ५ हजार ८६ केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
आज दहावीचा पहिला पेपर
परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार आहे. उद्या दहावीचा पहिला पेपर आहे. दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वपूर्ण वळण असते. दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या व भावी जीवनाच्या दिशा स्पष्ट व्हायला लागतात.
परीक्षा अत्यंत तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी परीक्षा मंडळाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. परीक्षा काळात मोबाइलवर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे.
यावर्षी १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने राज्यभर भरारी पथके नेमण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.