
सैतवडे प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
रत्नागिरी :शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे ता. रत्नागिरी प्रशालेत सोमवार दि. 26-02-2024रोजी मार्च 2024मध्ये होणाऱ्या शालांत परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्था सदस्य मा. श्री. लियाकत शेकासन तसेच मा.श्री.मुजफ्फर सय्यद व मा. श्री. इम्रान चिकटे आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अंगद मुठाळसर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवर व शिक्षक वृंदानी विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा देताना उज्वल भवितव्याचा वेद घेऊन भावी पिढीचे आदर्श होण्याचे आवाहन केले. संस्थाध्यक्ष मा. श्री. सज्जाद अ. करिम सय्यद, सचिव मा.श्री.समिर अ. रज्जाक सय्यद, खजिनदार मा. श्री.अ. वहाब फकिर महंमद खलपे तसेच मा. श्री. रफिक मुल्ला, मा. श्री.अब्दुल गणी दळवी, मा. श्री. जावेद काझी व मा. श्री. समिऊद्दीन माद्रे आदी सर्व संचालक महोदयांनी भ्रमणध्वनी द्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून रोहित थुळ व आदर्श विद्यार्थीनी म्हणून सलोनी पवार यांना मान्यवरांच्या हस्ते बुके देऊन गौरवण्यात आले. तसेच मा. श्री.किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या वाढ दिवसानिमित्त इयत्ता- 10 वी 12वी नंतर पुढे काय? या विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा निश्चित करायला उपयुक्त ठरेल अशा, सामाजिक कार्यकर्ते तसेच सम्राट फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. राजेश जाधव सर व माजी समाजकल्याण सभापती मा.सौ.ऋतुजा जाधव मॅडम यांनी तयार केलेल्या पुस्तिकेचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. सिद्धी लांजेकर मॅडम व आभार प्रदर्शन श्री. संतोष चव्हाणसर यांनी केले.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेचे ऋण निर्देश करताना शाळेबद्दलची आठवण म्हणून
एक भेट वस्तू मा.मुख्याध्यापक श्री. मुठाळ सर यांचेकडे सुपूर्द करून उत्स्फूर्तपणे शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.श्री.नितीन जाधवसर,सौ.नसिम शेकासन मॅडम,श्री.रमेश गंधेरेसर व संज्योत खेडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. फैय्याज भाटकर, श्री.रविंद्र लवंदे, श्री. विनायक कोळवणकर , सौ.सुवर्णा राजेंद्र बैकर व इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.