धामणी येथे कंटेनर- डंपरचा अपघातात तिघे जण जखमी
सोनू सखाराम गौतम हात आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन मुंबईहून गोव्याकडे जात होता तसेच म्हात्रे कंपनीचे डंपर चालक महंमद अन्सारी हा धामणी कडे खडी घेऊन जात असताना अपघात झाला असून डंपर रस्त्याच्या बाजूला खोल दरीत कोसळलेला आहे.
जखमीना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून अधिक उपचार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजीत मोरे करीत आहेत.
अपघाताची बातमी कळताच पोलीसानी घटना स्थळी धाव घेतली. यात चंद्रकांत कांबळे,सतिश कोलगे,विनय मनवल, सिद्धेश आंब्रे,रोहीत पाटील यानी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपघात स्थळाचा पंचनामा केला.