
देवरुख येथे मटका जुगारावर कारवाई
रत्नागिरी ः देवरुख (ता. संगमेश्वर) येथील मेडीकल दुकानाच्या आडोशाला अवैध मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित सदाशिव सागवेकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २६)सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देवरुख येथील एका मेडिकल दुकानाच्या शेजारी असलेल्या ईमारतीच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार संशयित अवैध मटका जुगार चालवत असताना सापडला. त्याच्याकडून साहित्यासह १ हजार ४५५ मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले. या प्रखरणी किरण देसाई यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.