
बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : बेशुद्धावस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष बसाप्पा मादर (क्य ३१, रा. मिरजोळे हनुमान नगर, मुळ : ताळोकोटी, जि. विजापूर, कर्नाटक) असे मृत तरुणाचे नाव आहे. हो घटना शनिवारी (ता. ९) सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मादर याची पत्नी झोपडीत मोठमोठ्याने ओरडत होती. पत्नीने संतोष उठत नसल्याचे सांगितले. त्याला हलवून पाहिले व तोंडावर पाणी मारले तरी त्याची हालचाल होत नव्हती. संतोषला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.