
माणी येथील खैर झाडांची चोरी
खेड :तालुक्यातील माणी शिंदेवाडी येथील तीन गटातील जागेतून ९ खैर जातीची झाडे ५० हजार किंमतीची चोरीस गेली आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणी मधलीवाडी येथील शत्रुघ्न बाबू आंब्रे यांच्या मालकीची जागा सर्व्हे ७५४अ, ब आणि ७९४ या शेतजमीनीतील ९ खैर जातीची झाडे अज्ञात चोरट्याने १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्रीच्या वेळी चोरुन नेली. या झाडांची किंमत सुमारे ५० हजार इतकी आहे. या चोरीची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी खैर झाडे चोरीची तक्रार नोंदवली आहे.