
दापोलीत विक्रमी २५० मिमी पाऊस.
दापोली : दापोलीत पावसाने कहर केला असून दिवसभरात पावसाचे प्रमाण 250 मिमी नोंदले गेले आहे. तालुक्याच्या विविध भागात अतिवृष्टीने, दरड कोसळ ल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे. तर रत्नागिरी, खेड येथे वाहतूक करणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
हर्णे फत्तेगड व राजेवाडी तसेच पाजपंढरी येथून दरडगस्त भागातील 5 कुटुंबातील 24 लोकांना यापूर्वी स्थलांतरित करण्यात आले आहे . मौजे दाभोळ येथील ढोरसई येथील आपदग्रस्त/दरडग्रस्त 5 कुटुंब व 35 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. शिरसोली मुगिज रस्ता पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. जालगाव समर्थ नगर, मित्रनगर भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचत आहे, संबधित ग्रामपंचायत मार्फत लोकांना सूचना दिलेल्या आहेत.
दापोली मंडणगड रस्त्यावर झाडे पडली होती ती काढून रस्ता पूर्ववत केला आहे.
सोळा घरांचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झालेले आहे. नगरपंचायत हद्दीमधील नागरबुडी भागात पाणी साचले आहे. कुटुंब स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. दापोली खेड वाहतुक बंद झाली आहे.
सडवे,भेजेवाडी ,म्हैसोंदा,ताडील कोंगळे,नवशी येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई, रत्नागिरी, खेड येथे वाहतूक करणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. बुरोंडी रस्त्यावर डोंगरावरून वाहणार्या प्रवासामुळे पाणी, माती रस्त्यावर येऊन रस्ता बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व तलाठी सदर ठिकाणी दाखल झाले आहेत. बारावाडी येथे सभागृहावर नारळाचे झाड पडून नुकसान झाले आहे.