
कुंभार्ली घाटासह परशुराम घाटातील दरड कोसळून वाहतूक विस्कळीत
चिपळूण:- जिल्ह्यात वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कुंभार्ली घाट आणि परशुराम घाटातील दरड कोसळण्याचे सत्र सुरुच असून कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली आहे.
कुंभार्ली घाटात गेले दोन दिवस सतत पडत असणार्या पावसामुळे गुहागर विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रशासनाचे काम सुरू असून थोड्याच संध्याकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

परशुराम घाटातील दरड कोसळण्याचे सत्र चालू असून यावर्षी दरड कोसळू नये. यासाठी ठेकेदार व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती परंतू तरीही दरड कोसळली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.