
पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुरधुंडा येथे शासन आपल्या दारीं उपक्रम साजरा
शासन आपल्या दारी उपक्रमाचा सुमारे २५० हुन अधिक लोकांनी घेतला लाभ
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य किरण भैय्या सामंत संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायत आणि महाईसेवा केंद्र कोळंबे यांच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत सुमारे २५० हुन लोकांना यांचा फायदा मिळाला आहे.
यामध्ये तालुका महसूल विभाग. तालुका कृषी विभाग. पंचायत समिती संगमेश्वर. महावितरण. पोलीस स्टेशन संगमेश्वर. आरडीसीसी बँक देवरुख. नाबार्डचे व्यवस्थापकीय अधिकारी रत्नागिरी. पोस्टाचे अधिकारी. महा-ई-सेवा केंद्र कोळंबे तलाठी कुरधुडा ग्रामसेवक कुरधुंडा सरपंच. उप सरपंच. सर्व. ग्रामपंचायत सदस्य. पोलीस पाटील. व इतर सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व योजनाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घेतला त्यामध्ये अनेक योजनांची माहिती. तसेच उत्पन्न दाखले,श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, तसेच सर्व संबंधित खात्याशी निगडित असणारे प्रश्न मार्गी लावण्यात आले.
सदर मेळाव्याला उपस्थित. संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे,नायब तहसीलदार गोताड, नायब तहसीलदार पंडित, नाबार्ड टी डी एम. कुलकर्णी,पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, आरडीसीसी बँक व्यवस्थापक साळुंखे,तालुका कृषी अधिकारी कांबळे, कृषी सहाय्यक घोबाळे.सरपंच सबा जमूरत अलजी. उप सरपंच तैमूर अलजी,माजी सरपंच जमूरत अलजी, ग्रामपंचायत सदस्य संगीता लिंगायत,नाजीमा बांगी,शाहिस्ता अलजी, मयुरी डावल,पोलीस पाटील नफिसा फकीर,तंटामुक्त अध्यक्ष निलेश पाताडे, अंगणवाडी सेविका तरंनुम अलजी, शुभांगी धागडे, दिक्षा जाधव,महावितरण कर्मचारी जाधव. तलाठी कुरधुंडा पटवर्धन,ग्रामसेवक श्रेया भाईयजे तसेच मुख्याध्यापक शेख सर. मुनिजा अलजी,पवार सर नितीश जाधव.ग्रामपंचायत कर्मचारी रुपेश लिंगायत. पायल लिंगायत. मैत्री वाडकर उपस्थित होते.

