
भोस्ते घाटात ट्रक कोसळला दरीत; चालक सुदैवाने बचावला
खेड :मुंबई गोवा महामार्गावर खेडनजिक असलेल्या भोस्ते घाटात ४ मे रोजी रात्री एक ट्रक दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. चालक सुदैवाने बचावला असून त्याला किरकोळ इजा झाली आहे.
ट्रक भोस्ते घाटातून जात असताना अचानक रिव्हर्स गिअर पडल्याने ट्रक मागे येत दरीत कोसळला. एका मोठ्या झाडाला ट्रक अडकला. त्यामुळे तो अधिक खोल दरीत कोसळला नाही. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला.