
उध्दव ठाकरे यांचे कोंबे राजापूरमध्ये जोरदार स्वागत
ऱाजापूर:- बारसूच्या आंदोलकाना भेटण्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरचे कोंबे (राजापूर) येथे लॅडींग झाले त्यावेळी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्यासह सेनेच्या नेत्यानी त्यांचे जोरदार स्वागत केले त्यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार घोषणानी परीसर दणाणुन गेले.
स्वागतानंतर उध्दव ठाकरे बारसूकडे रवाना झाले . बारसुतील प्रकल्पग्रस्त जनतेची भेट घेवुन ते परीसरातील कातळशिल्पांची पहाणी करुन ते गिरमादेवी कोंड येथे दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत .आमदार राजन साळवीनी त्यांचे स्वागत केले. उध्दव ठाकरेंसमवेत विधान परीषद विपक्ष नेते अंबादास दानवे व अन्य उपस्थीत आहेत ..