गोव्याप्रमाणे कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार बीच शॅक
रत्नागिरी :गोव्यातील बीचवर पर्यटकांसाठी बांधण्यात येणारे शॅक्स आता आगामी काळात कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील 8 समुद्रकिनाऱ्यांवर हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.
महाराष्ट्रातील बीचवर पर्यटनास चालना देण्यासाठी शॅक उभारण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये शॅक्स उभारले जाणार आहेत. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यातील 8 किनाऱ्यांवर पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.
रत्नागिरीतील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्गातील तारकर्ली, कुणकेश्वर, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या ठिकाणी हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. इतर किनाऱ्यांवरही टप्प्याने याची कार्यवाही केली जाणार आहे.