रत्नागिरीत सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
रत्नागिरी:– गुड फ्रायडे ते रविवार अशा चार दिवस सलग सुट्टया आल्याने या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
गणपतीपुळे, मांडवी, भाट्ये ,आरे- वारे किनारी पर्यटकांच्या गर्दीचे जथ्थे पहावयास मिळत आहेत. पर्यटक किनार्यावर स्कुबा डायव्हिंग, स्नॉकर्लिंग यासारख्या साहसी क्रीडा प्रकाराचा बिनदिक्कत आनंद लुटत आहेत. काही ठिकाणी सागरीसुरक्षा रक्षक नाही किंवा पोलिस बंदोबस्त नसल्याने पर्यटकांची सुरक्षितता रामभरोसेच असल्याचे चित्र आहे.
गेली तीन दिवस गुड फ्रायडे, शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने रत्नागिरीत पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतील पर्यटक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. गणपतीपुळे, पावस येथील मंदिर पाहण्याबरोबरच समुद्र किनारी डुंबण्याचा आनंदही पर्यटक घेत आहेत.