
खेड मध्ये रेल्वेतून पडून तरुणाचा जागीच मृत्यू
खेड : कोकण मार्गावरून धावणाऱ्या एका रेल्वेगाडीतून पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील विन्हेरेनजीक मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव समजू शकले नाही. हा तरुण मूळचा झारखंड येथील रहिवासी आहे. तो कामासाठी रेल्वेने गोवा येथे जात होता. रेल्वेतून प्रवास करत असताना तोल जाऊन तो खाली पडला. बुधवारी सकाळी तरुणाचा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळला. या बाबत महाड पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी महाड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.