
शिक्षक बदल्यांचा शासन निर्णय रद्द; पुढील वर्षीच्या बदल्या लांबण्याची शक्यता
रत्नागिरी:महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी यापूर्वी राज्य शासनाने काढलेले शासन निर्णय रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या बदल्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाला शासन निर्णय निर्गमित करण्याच्या दृष्टीने सल्ला देण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2022 मधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. असे असताना शैक्षणिक वर्ष 2023 मधील बदल्यांसाठी शासनाने अभ्यासगट स्थापन केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे हे अध्यक्ष आहेत. समितीत नाशिक, बीड, उपसचिव, जिल्हा परिषद आस्थापना, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
या अभ्यासगटाने प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणे, तसेच काम करताना त्यांना बदल्यांसंदर्भात येणार्या अनुभवांचा उपयोग करून व प्रातिनिधिक शिक्षकांकडून चर्चेमधून प्राप्त होणारी माहिती
यासंदर्भातील विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्देश, संगणकीय प्रणाली तयार करणारेचे अधिकारी यांना सन 2022 ची प्रक्रिया राबविताना आलेल्या अडचणी, सन 2022 ची प्रक्रिया राबविताना शासनाने वेळोवेळी दिलेली स्पष्टीकरणे याचा तौलनिक अभ्यास करून शासनाच्या उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार
कार्यान्वित असलेल्या बदल्यांच्या धोरणासंदर्भात आवश्यक त्या शिफारशी करणे. सन 2023 च्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेने संभावित वेळापत्रक सादर करणे अभिप्रेत आहे.
याबाबतचा अहवाल या अभ्यासगटाने एका महिन्यात शासनास सादर करावयाचा आहे, असे आदेशात म्हटले आहे.