खंडाळा येथे ‘स्मिता क्लिनिक’च्या नवीन शाखेचा दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून शुभारंभ
रत्नागिरी :जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा विस्तार होत असून याचाच एक भाग म्हणून खंडाळा येथे डॉ. मयुरेश सुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’च्या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अत्यंत उत्साहात पार पडला. खंडाळा आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या नवीन क्लिनिकच्या उद्घाटनामुळे स्थानिक नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
उद्घाटनाचा हा महत्त्वपूर्ण सोहळा संपन्न करण्यासाठी खंडाळा परिसरात विशेष उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्वतः क्लिनिकच्या नवीन वास्तूची पाहणी करून डॉ. मयुरेश मोहिते आणि उपस्थित मोहिते कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील सामाजिक व वैद्यकीय वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नवीन उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला.
या दिमाखदार सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यामध्ये बाबूशेठ म्हाप, शिवसेना तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, शिवसेना विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, जाधव सर, शिवसेना उपविभागप्रमुख अझीम चिकटे, अनिकेत सुर्वे, प्रशांत घोसाळे, माजी सरपंच अमित वाडकर तसेच अमोल बैकर यांच्यासह अनेक मान्यवर सामील झाले होते. या सर्व उपस्थितांचे मोहिते कुटुंबीयांच्या वतीने अत्यंत आदरपूर्वक आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व तज्ज्ञांनीही या सोहळ्यास उपस्थित राहून डॉ. मयुरेश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने डॉ. मुळे, डॉ. जाधव, डॉ. विकी सावंत, डॉ. दीक्षा सावंत आणि पॅथॉलॉजिस्ट प्रसाद पेढे यांच्यासह मोहिते कुटुंबीयांचे आपत्स्वकीय, नातेवाईक, जवळचे मित्रपरिवार आणि खंडाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अत्यंतण सलोख्याचा आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
खेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या खंडाळा व लगतच्या परिसरातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय उपचारांची सोय व्हावी, यासाठी हे क्लिनिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्मिता क्लिनिकचा पत्ता खंडाळा बसस्थानकासमोर, लाईफलाईन मेडिकलच्या शेजारी असा असून, हे क्लिनिक दररोज सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत रुग्णांच्या सेवेसाठी खुले राहणार आहे. या नवीन शाखेमुळे खंडाळा व परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवेची अधिक प्रभावी सुविधा उपलब्ध होणार असून, डॉ. मयुरेश मोहिते यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.