डेंग्यूला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कसली कंबर
रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने कंबर कसली आहे. जानेवारी 2026 ते ऑक्टोबरपर्यंत तालुक्यात 31 डेंग्यू ााs ाग्णीं नोंद झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि क्षेत्रीय सर्वेक्षणाचे कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनीही दक्षता घेत आठवडय़ातून एक दिवस ‘कोरडा दिवस‘ पाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांच्या रणनीती ठरवण्यासाठी बुधवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. संभाव्य जोखमीच्या भागांमध्ये (हाय-रिस्क झोन) तातडीने सर्वेक्षण करणे, डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे आणि नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करणे या मुद्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा हिवताप कार्यालयाच्या अतिरिक्त हिवताप अधिकारी श्रीमती मयेकर, रिजनल कॉलेज कोऑर्डिनेटर डॉ. सचिन धांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, विस्तार अधिकारी पुजारी, तालुका विस्तार अधिकारी वाघमारे, डॉ. परशुराम निवेंडकर, कीटकशास्त्रज्ञ श्रीमती मेस्त्राr, आरोग्य सहाय्यक शेटय़े तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य सहाय्यक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
डेंग्यूचा प्रसार पूर्णपणे रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱयांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर घरोघरी प्रभावी सर्वेक्षण करण्याबाबतचे काटेकोर नियोजन या बैठकीत करण्यात आले. आरोग्य यंत्रणा संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून, डेंग्यूचा प्रादुर्भाव लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सामूहिक प्रयत्नांतून रत्नागिरी तालुका डेंग्यूमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग आणि नागरिक मिळून प्रभावी पावले उचलत आहेत.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
केवळ आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी नव्हे, तर नागरिकांच्या सक्रिय सहकार्यातूनच डेंग्यूवर मात करता येऊ शकते. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.