मालगुंड समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-गायवाडी समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश महादेव दुर्गवळी (वय ६६, मालगुंड-दुर्गवळीवाडी, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.१५) दुपारी एकच्या सुमारास मालगुंड-गायवाडी येथील स्मशनभुमीजवळील समुद्रकिनारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.