विदेशी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील बांबर फाट्याजवळील सार्वजनिक रस्त्यावर विदेशी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.15 वा.सुमारास करण्यात आली.
अमोल दत्ताराम ताम्हणकर (४०, रा. कशेळी ताम्हणकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मद्यपान करणाऱ्या प्रौढाचे नाव आहे. संशयित हा सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुर्याजी पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.