रत्नागिरीत रहदारीस अडथळा ठरणारा टेम्पो उभा केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरात पॉवरहाऊस ते डीअर पॉलीटेक्नीक कॉलेज जाणाऱ्या रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी टेम्पो उभा केल्याप्रकरणी वाहन चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:१० वाजण्याच्या सुमारास पॉवरहाऊस ते पॉलीटेक्नीक कॉलेज जाणाऱ्या रस्त्यावर, जोशी यांच्या ‘ओंकार’ घरासमोर हा प्रकार उघडकीस आला.
आरोपी कुंदन रघुनाथ आगाशे (वय ५४, रा. खालची आळी, मुरलीधर जवळ, ता. व जि. रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील भारतबेंझ कंपनीची चारचाकी टेम्पो गाडी (क्र. एमएच ०९ ईएम ५५७४) रस्त्यावर अन्य वाहनांच्या आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यात अडथळा निर्माण होईल अशा बेजबाबदारपणे व नियमबाह्य रीतीने उभा केली होती.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार ईशिता रूपेश वाडावे (वय ३७, नेमणूक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:४७ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.