सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पटवर्धन हायस्कूलचे१६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलने इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या परीक्षेत शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत यश संपादन करत उज्ज्वल यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांचे कठोर परीश्रम व शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी यशस्वी झाले. शिष्यवृत्ती विभागप्रमुख माणिक भोये यांच्या नेतृत्वाखाली मराठीसाठी कौस्तुभ पालकर व मीना टापरे, गणितसाठी मीरा दामले, प्रतिभा बंडबे व गणेश धामापूरकर, बुद्धिमत्तेसाठी श्रद्धा बोडेकर, माधवी तेंडुलकर, श्वेता विलणकर, हेमलता गुरव आणि इंग्रजीसाठी माणिक भोये प्रज्ञा डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय वेळेव्यतिरिक्त अतिरिक्त मार्गदर्शन करून अभ्यास करून घेतला. तसेच उमेश दिवटे यांनी ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर, उपमुख्यापक रुपेश पंगेरकर, पर्यवेक्षिका कल्पना शिरोळकर आणि पर्यवेक्षक अमर लवंदे यांनी सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
गुणवंत विद्यार्थ्यांची नावे
विद्यार्थ्याचे नाव व जिल्हा गुणवत्ता यादीतील क्रमांक या क्रमाने खुशी विद्याधर कांबळे (१०), सृष्टी सुशांत पेडणेकर (२३), धैर्या नरेंद्र गवाणकर (२४), वेदा विजय लिंगायत (२७), अंश महेश भावे (२८), आराध्य अवधूत शेट्ये (३५), आराध्या सचिन गिरी (४२), अभिनव जीवन देसाई (५५), कार्तिक संदीप फडणीस (७२), अवनी सचिन नागवेकर (७४), सृष्टी सोपान टापरे (७७), श्रावण्या रितेश भगवे (८३), वरद राजेश राणे (८४), आर्या अविनाश रहाटे (८५), आराध्या ओमकार केळकर (८९), सान्वी निनाद बेहेरे (९७).
“पटवर्धन हायस्कूलच्या १६ विद्यार्थ्यांनी आठवीच्या परीक्षेत व कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरच्या २२ विद्यार्थ्यांनी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अशा एकूण ३८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. जिल्ह्यात पुन्हा भारत शिक्षण मंडळाचे नाव उज्ज्वल केले आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन.”
- धनेश रायकर, कार्यवाह.