टेंडर मिळविण्यासाठी बनवटीकरण ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील नाचणे येथील महावितरण परिमंडळ कार्यालयाचे टेंडर मिळविण्यासाठी बनावटीकरण करणाऱ्या कन्स्ट्रक्शन मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मनोहर फटे ( वय ४४, शांताई कन्स्ट्रक्शन रा. वैभव निवास जुन्या वॉटर पार्क शेजारी, शिवाजीनगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे संशयित मालकाचे नाव आहे. ही घटना २८ एप्रिल ते १७ जून २०२५ या कालावधीत महावितरण परिमंडल कार्यालय, नाचणे रोड, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने २८ एप्रिल ते १७ जून २०२५ या कालवधीत यापुर्वी शांताई कन्स्ट्रक्शन ला त देण्यात आलेल्या ईईसी रत्नागिरी इटी-६६ २०२४-२५ या टेंडरसाठी वापरलेला ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर क्र. सीएक्स २२११९४ यांची पीडीएफ पाईल एडीट करुन कामाचे नाव बदलल्याचे आढळून आले. त्यांची प्रिट काढून त्यावर टेंडरचा मजकुर लिहून टेंडर मिळवण्यासाठी फिर्यादी यांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा वापर इइसी आरटीएन इटी -०६ २०२५-२६ या तीन टेंडरसाठी डिक्लेरेशन बॉन्ड म्हणून महावितरणच्या संकेतस्थळावर वापरला. या प्रकरणी फिर्यादी अनुराथ सुरेशराव आंधनसरे (वय ४५, मुळ ः पाल्म रेसिडंसी सोनवणे मळा नाशिक, सध्या रा. थिबापॅलेस रोड, जैन कॉलनी रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित कन्स्ट्रक्शन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.