४५ मीटर उंचीवरून पडून कामगाराचा दुर्दैवी अंत जेएसडब्ल्यू पोर्ट परिसरातील घटना
रत्नागिरी ः तालुक्यातील जे. एस डब्ल्यू पोर्ट बी-५ येथील कोल शेडच्या ४५ मिटर उंचीवरुन पडलेल्या कामगाराला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. राजूकुमार बालेश्वर सिंह (वय ३७, रा. सेमरा, अनुग्रह नगर सिवान -राज्य बिहार) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजूकुमार सिंह हे जे.एस डब्ल्यू पोर्ट-बी-५ येथील कोलशेडचे अंदाजे ४५ मिटर उंचीवरिल लोखंडी पलिंगचे काम करुन कामाची वेळ संपल्यावर सायंकाळी साडेपाच वाजता इतर कामगारांसह परत खाली उतरत असताना अंगला लावलेल्या सेफ्टी हुचा वापर करुन पुढे चालत असताना हुक बदलतेवेळी हुक न अगडकल्याने त्यांचे पाऊल फायबर पत्र्यावर पडल्याने फायबरचा पत्रा तुटून ते ४५ मिटर उंचीवरुन खाली पडले. त्यांच्या हाताला, पोटाला, पायाला जखमा होवून बेशुद्ध झाले. उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.