समुद्रातील मासेमारी बंद झ़ाल्याने खाडीतील मासळीला मागणी
रत्नागिरी (प्रतिनिधी) – समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारीला बंदी असल्याने मासळी बाजारात ताजी मासळी मिळत नाही. त्यामु्ळे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जात नाहीत.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत खाडीतील मासळी विक्रीकरिता येत आाहे. पण ही मासळी किलोवर न मिळता वाटा पध्दतीने विकली जात आहे. चढा दर असतानाही मासळीचा खप हातोहात होत आाहे. विक्रीसाठी मासे आणणारे माशांची विक्री होतेय म्हणून समाधानी आहेत तर खवय्यांना आपल्या जिभेचे चोचले पुरवता येत असल्याने तेही चांगलेच सुखावले आहेत.