कोल्हापूर येथील तरुणीचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी, : तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्याची लाट अंगावर जावून पाण्यात बेशुद्ध पडलेल्या पर्यटक तरुणीला उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. संध्या स्वप्नील कांबळे (वय २४, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना २६ मे २०२६ सकाळी साडेनऊच्या सुमारास सीपीआर कोल्हापूर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या कांबळे ही तरुणी २५ मे सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आली होती. मंदिराच्या समोरिल पाण्यात ती खेळत होती. अचानक आलेली लाट तिच्या अंगावरुन गेली व ती पाण्यात पडली. तेथेच ती बेशुद्ध झाली. तात्काळ तिला प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.