रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल!
११४ ग्रामपंचायतींमधील १७४ रिक्त पदांसाठी २८ एप्रिलला मतदान; आचारसंहिता लागू
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात आता पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींमधील १७४ रिक्त पदांसाठी येत्या २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदस्य पदांसाठी आणि सरपंच पदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील एकूण ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण १७४ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सोमवार पासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. “ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे, त्या हद्दीत निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहितेचे नियम कडकपणे पाळले जातील,” अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विश्वजीत गाताडे यांनी दिली आहे. या काळात सरकारी योजनांच्या घोषणा किंवा मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही काम करता येणार नाही.
निवडणूक जाहीर झालेल्या ठिकाणी २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायती मधील १७४ रिक्त पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे. निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. प्रशासनाने या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली असून, मतदारांनी शांततेत आणि उत्साहात या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट आवश्यकता असल्यास घेणे
तालुकानिहाय पोटनिवडणूक ग्रा.पं.ाााr :
मंडणगड-दहागाव, घराडी, उन्हवरे, देव्हारे, वाल्मिकीनगर.
दापोली- करजगाव, बांधतिवरे, पावली, सारंग, शिरसाडी, मांदिवली, कवडोली,
फणसु-उर्फी, वहेळवी, सडवे, देगाव, टाळसुरे.
खेड- ािांाावली, अलसुरे, भोस्ते, संगलट, देवघर, भेलसई, निळीक.
गुहागर-खोडदे, ािांद्रावळे, वेळंब, आवेरे असोरे, पालकोट त्रिशुळ, झोंबडी,
कौंढरकाळसुर, साखरी त्रिशुळ, वरवेली, असगोली, मढाळ, वेलदूर, पांगारी
त.हवेली, धोपावे तेटले, परुरी, सडेजांभारी, ािाखली, वडद.
ािापळूण-हडकणी, आंबतखोल, डुगवे, गुळवणे, ढाकमोली, भिले, कळकवणे,
देवखेरकी, गुढे, कामथे खुर्द, कामथे बुद्रुक, गाणे, मालदोली, कालुस्ते खु., कापरे,
असुर्डे,
संगमेश्वर- कोंड असुर्डे, कोंडगाव, राजिवली, साखरपा, तुरळ, असुर्डे, आंबव
पोंक्षे, किरडुवे, माभळे, मारी, ओझरखोल, पाटगाव, शिवने, शिरंबे, सरंद, तांबेडी,
तुळसणी, कासे, फुणगुस, वांद्री, मावळंगे.
रत्नागिरी – ाारवेली, गणेशगुळे, तरवळ, जांभारी, मावळंगे, टेंभ्ये, वेतोशी.
लांजा- कुरुंब, वाघ्रट, वेरळ, बेनी बु., भडे, शिरवली, आगवे, खावडी, कारी,
कोट, पुनस, कोर्ले, वेरवली खुर्द.
राजापूर- कोळवणखडी, नाणार, झर्ये, वडदहसोळ, येळवण, हातिवले, खरवते,
केळवली, माडबन, भालावली, कळसवली, कोंडये तर्फे सौंदळ, साखर, प्रिंदावन,
धाउलवल्ली.