माळनाका येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः रिक्षात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारासपूर्वी तपासून मृत घोषित केले. योगेश चंद्रकांत नलावडे (वय ४९, रा. जुना माळनाका रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.२२) सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार यांचे भाऊ विद्याध्र नलावडे हे सकाळी सातच्या सुमारास फुले काढण्यासाठी घराशेजारी गेले असता योगेश नलावडे हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ०९५६) या मधील मागील सिटवर टेकून झोपलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षाता विभागात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.