सौर धोरणातील बदलांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट
रत्नागिरी : जिल्ह्यातील सौर उद्योजकांच्या वतीने AIREA (All India Renewable Energy Association) मार्फत मा. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री श्री. उदय सामंत यांची भेट घेऊन MSEDCL कडून करण्यात आलेल्या सौर धोरणातील अलीकडील बदलांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
बैठकीदरम्यान खालील प्रमुख मुद्दे मांडण्यात आले:१) १० किलोवॅटपर्यंतचे ऑटो अप्रूव्हल बंद करण्यात आलेली व्यवस्था पुन्हा सुरू करणे.२) प्रति किलोवॅट १०० युनिट निर्यात मर्यादा व १५० युनिट उत्पादन कॅपिंग रद्द करणे. ३) १०० युनिटपेक्षा अधिक निर्यात करणाऱ्या ग्राहकांवर लादलेली दंडात्मक बिलिंग तत्काळ मागे घेणे. सदर निर्बंधांमुळे राज्यातील हजारो सौर ग्राहकांना आर्थिक फटका बसत असून सौर ऊर्जा स्वीकारावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले.
मा. श्री. उदय सामंत यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले असून लवकरच मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.या वेळी अध्यक्ष ग्राहक पंचायत श्री. संजय वैशंपायन, ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनचे सदस्य श्री.वसीम नाईक, श्री. हृषिकेश कोंडेकर, श्री. ऋषिकेश कामटेकर, श्री. मकरंद झगडे, श्री. शैलेश मंझळ,श्री.शिफान फोंडू, श्री. रोहन आदी उपस्थित होते.