करवाढीच्या प्रस्तावावरून नगर परिषदेत खडाजंगी
‘उबाठा’ गटाचा विरोध, उपनगराध्यक्षांनीही मांडली लोकभावना
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पला आणि २०२५-२६ च्या सुधारित अर्थसंकल्पला मंजुरी देण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आर्थिक डबघाईला आलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ करून झालेली तूट भरून काढण्यासाठी कर लागू करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले. त्यामध्ये अग्निशमन कर, दिवाबत्ती कर तसेच स्वच्छता कर लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
हे तिन्ही कर प्रत्येकी २ % टक्क्यांनी वाढवावे हा प्रस्ताव होता. मात्र यामुळे विश्वासाने निवडणूक दिलेल्या रत्नागिरीकरांवर मोठा आर्थिक भार पडेल असे उपनगराध्यक्ष समीर तीवरेकर यांच्यासह ए
काही सदस्यांनी सभेत मांडले. तर शिवसेना उबाठा गटाकडून याला विरोध नोंदवण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी यातील अग्निशमन आणि दिवाबत्ती कर लागू करण्याला मान्यता द्यावी आणि स्वच्छता कराबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे मत मांडले. यावर अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत अर्थसंकल्पला मंजुरी देत ही सभा स्थगित करण्यात आली.