आता शाळेतच होणार विद्यार्थ्यांचे समुपदेशन
राज्य सरकारकडून शाळेत मानसोपचार तज्ञ नेमण्याचा निर्णय
रत्नागिरी: शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यास आणि इतर कारणांमुळे येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. प्रत्येक शाळेत समुपदेशनासाठी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संकटाच्यावेळी संपर्क साधता यावा यासाठी पाठ्यपुस्तकात अधिकृत हेल्पलाइन क्रमांकही छापला जाणार आहे. शिक्षणक्षेत्रातील तणावमुक्त वातावरण निर्मितीसाठी त्याचा उपयोग होणार आहे तसेच विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे प्रशिक्षण, समुपदेशन आणि वेळेवर मार्गदर्शन मिळावे यासाठी ऑनलाईन समुपदेशन प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद संचालकांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज आहे हे ओळखता यावे यासाठी शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांना अविरत शिक्षण अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
चौकट
समुपदेशन फायदेशीर