खंडाळा तिहेरी हत्या प्रकरणात पोलिस हवालदाराचे निलंबन
रत्नागिरी
जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक पोलीस कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशी अंती पोलीस हवालदार प्रसाद सोनावणे याला निलंबित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढू लीगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी देखील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसारच, पहिली कारवाई म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.