सीताराम वीर, राकेश जंगम खुनाचा तपास डीवायएसपी निलेश माईनकर यांच्याकडे
रत्नागिरी:- जयगड पोलिसात दाखल करण्यात आलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खूनाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपवला आह़े. एक वर्ष उलटूनही राकेश जंगम याच्या बेपत्ता प्रकरणाचा उलघडा जयगड पोलिसांना करता आला नव्हत़ा या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सुचनेनुसार दोन्ही खूनाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आह़े. शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात आरोपी दुर्वास मयेकर याने सीताराम लक्ष्मण वीर (55, ऱा कळझोंडी रत्नागिरी) व राकेश अशोक जंगम (28, ऱा वाटद खंडाळा रत्नागिरी) या दोघांचा खून केल्याची कबुली दिली होत़ी दुर्वास याने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, सीताराम वीर हे दुर्वास याची प्रेयसी भक्ती मयेकर हिच्याशी फोनवर अश्लिल बोलत असत़ 29 एप्रिल 2024 रोजी सीताराम हे दुर्वास याच्या सायली बार येथे दाऊ पिण्यासाठी आले हेत़े यावेळी दुर्वास पाटील, विश्वास पवार व राकेश जंगम या तिघांनी सीताराम यांना मारहाण केल़ी यामध्ये सीताराम यांचा मृत्यू झाला होत़ा.
सीताराम यांचा खून केल्यानंतर दुर्वास याने चलाखी करत मृतदेह रिक्षामध्ये भरून त्यांच्या घरी नेल़ा तसेच सीताराम हे चक्कर येवून पडले असल्याचा बनाव केल़ा नातेवाईकांनी या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सीताराम यांचा मृत्यू झाल्याचे निश्चित केले व मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आल़े या खून प्रकरणातील संशयित आरोपी राकेश जंगम याला दाऊचे व्यसन होत़े राकेश हा खूनाची वाच्यता करेल, अशी भीती दुर्वास याच्या मनात सतावत होत.