जिल्ह्यात १७ पर्यंत मनाई आदेश
रत्नागिरी: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आजपासून १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश प्र. अपर जिल्हादंडाधिकारी राहुल गायकवाड यांनी दिला आहे.जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाते. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व १६ रोजी गोपाळकाला हे सण आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.