जिल्ह्यात दिवसभार संततधार
रत्नागिरी: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात तीन दिवसांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडेल अशी शक्यता होती, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर बहुतांश भागात पावसाची केवळ रिपरिप पाहायला मिळाली.
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, आज 22 जुलैपासून 25 जुलैपर्यंत जिह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत पावसाचा जोर वाढू शकतो. गेल्या 24 तासांत जिह्यात सरासरी 32.94 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये मंडणगड – 47.00 मिमी, खेड – 23.42 मिमी, दापोली – 37.28 मिमी, चिपळूण – 22.44 मिमी, गुहागर – 27.20 मिमी, संगमेश्वर – 39.50 मिमी, रत्नागिरी – 25.66 मिमी, लांजा – 36.60 मिमी, राजापूर – 37.50 मिमी पाऊस पडला.