खाडीपट्टा 36 तासापेक्षा जास्त वेळ अंधारात
संगलट
खेड तालुक्यात पावसाने धुवाधार बॅटिंग चालू असताना वारंवार वीज खंडित होणे यात रोजचे झाले आहे. महावितरणचा कामाचा फटका पंचक्रोशी मधील नांदगाव संगलट ,कोरेगाव, शिरशी, आमशेत, रजवेल ,सवणस, आधी गावांमध्ये विजेचा खेळ खंडोबा चालू आहे .
खरंतर 12 तासापेक्षा जास्त वेळ ग्राहकाला अंधारात ठेवता येत नाही, असा नियम असताना या पंचक्रोशी मध्ये गेले दोन दिवस नागरिक काळोखात आहेत. ह्या पंचक्रोशीतील लोकांनी जर महावितरणकडे संपर्क साधला तर फोन न लागणे, फोनवरती नीट न बोलणे असेही प्रकार अधिकाऱ्यांकडून होतात. या सर्व गोष्टींचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसतो. खरंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पावसाअगोदर विजेसंदर्भातली बहुतांश कामे पूर्ण केल्याचा तोंडी दावा अनेक वेळा ऐकायला मिळत होता. मात्र हा दावा आता खोटा ठरल्याचे चित्र खाडीपट्ट्यात पाहायला मिळत आहे.
खाडीपट्ट्यात विद्यार्थी वयस्कर आजारी लोक यांना या सगळ्याचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे या खाडीपट्ट्यामध्ये कोरेगाव येथे सरकारी दवाखाना आहे. शेतकरी शेतीची कामे करत असताना विंचू दंश करणे, जीव जनावर चावणे असे सर्व प्रकार या खाडीपट्ट्यात होतात अशा वेळेला जर प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेले तर वीज नसल्यामुळे त्या याचा मोठा फटका हा त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला बसतो.
खरंतर महावितरणचे भोंगळ कारभार याचा फटका नाहक ग्राहकाला बसत आहे. खाडीपत्त्यामध्ये या बाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार अनेक पक्षाचे युवा नेते यांनी लक्ष घालून गेले. तीन दिवसापासून बंद असलेल्या गावांमध्ये लाईट नसल्याने तेथे त्वरित वीज चालू करावी तसेच अधिकाऱ्यांना समज देऊन कारभार कसा सुधारेल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सध्या या पंचक्रोशीतून जोर धरून जोर धरत आहे.