रत्नागिरी जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे
रत्नागिरी: मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या खाते प्रमुखांचा बदल सुरु झाला आहे. बहुसंख्य अधिकारी बदलीने दुसर्या जिल्ह्यात गेले आहेत. तसेच काहीजण बदलीने जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रमुख अधिकार्यांच्या बदल्या होताना दिसत आहेत. यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. यादव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी शितल कबनुरे – फुंड यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी या पदाचा पदभार मंगळवारी हाती घेतला आहे. पी.डी.यादव यांची बदली मात्र जिल्ह्यातच झाली आहे. त्यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक हे सोपविण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, यांची बदली सातारा येथे झाली आहे. राहुल देसाई यांनी 2 वर्षे या पदावर काम केले आहे. त्यांच्या जागी आता सागर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. सागर पाटील यांनी यापुर्वी राजापूर गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. शिक्षणअधिकारी बी.एम.कासार यांची इचलकरंजी येथे बदली झाली आहे. ते मंगळवारी या पदावरून कार्यमुक्त झाले. त्यांच्या जागी आता किरण लोहार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गलोहार हे पुर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी होते. त्यानंतर सध्या ते विविध योजना अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांची प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. चिपळूण बांधकाम कार्यकारी अभियंता म्हणून सोलापूर येथून हर्षल चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.