
दापोलीत ७५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
दापोली : तालुक्यातील खेर्डी, चोपडेवाडी, करमरकरची पाखर या जंगलमय भागात ७५ वर्षीय लक्ष्मी धोंडू घडवले (रा. खेर्डी, गायकरवाडी) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्या ७ जुलै २०२५ पासून बेपत्ता होत्या आणि त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद दापोली पोलीस ठाण्यात ९ जुलै २०२५ रोजी (नापत्ता रजि. २५/२०२५) करण्यात आली होती.
११ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह जंगलमय भागात मिळून आला. मृत्यूचे कारण पी.एम. रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल. दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक ४८/२०२५) करण्यात आली आहे.