रत्नागिरी आगारातील ९५ एसटी कर्मचाऱ्यांची बदली
रत्नागिरी : कोकणातील नोव्हेंबर-डिसेंबर आगारात साली २०२४-२५ विनंतीनुसार चालक-वाहक, मेकॅनिक अशा एकूण ९५ एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली करण्यात आली आहे. काहीजणांचे विनंती तर काहीजणांनी विविध कारणे देऊन बदल्या केल्या असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चालक-वाहकांच्या बदल्यामुळे उर्वरित असलेल्या रत्नागिरी आगारासह इतर आगारातील चालक वाहकांवर कामकाजाचा मोठा भार पडत आहे. कर्मचाऱ्यांना डबल ड्यूटी करावी लागत आहे. त्यामुळे रत्नागिरी आगारासह इतर आगारात चालक-वाहकासह इतर पदे भरावीत, अशी मागणी वाढत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक, वाहक, अधिकारी, बाहतूक नियंत्रक, मेकॅनिक, कार्यालयीन कामकाज बघणारे क्लार्क पासह विविध कर्मचारी काम करीत असतात.
यासर्व आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी गंभीर आजारपण, पती-पत्नी एकत्रीकरण, आपापसातील बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करतात. परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, बदल्यांमध्ये अनियमितत होत असते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही.
दरम्यान, रत्नागिरी आगारातील कित्येक जणांनी बदलीसाठी अर्ज केले होते. २०२४-२५ वर्षात ८५ चालक, वाहक तर १० मेकॅनिक अशा ९५ एसटी कर्मचाऱ्यांची बदली सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, मराठवाडा, मुंबई, पुणे यासह विविध जिल्ह्यात करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाबाहेर बदली केल्यामुळे चालक वाहकांची संख्या आणखीन कमी झाली असून आहे त्या चालक-वाहकावर भर पडत असून लांब पल्ल्याचा प्रवासानंतर जिल्हाअंतर्गत एसटी चालवावी लागत आहे.
दरवर्षी काही कारणास्तव एसटी कर्मचारी विनंती बदली मागत असतात. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार करून निर्णय घेतला जातो. २०२४-२५ साली एकूण ९५ एसटी कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ८५ चालक-वाहक, १० मेकॅनिकचा समावेश आहे. असे रत्नागिरी आगाराच्या डीटीओ राजेश्वर जाधव सांगितले.