
शहरात मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी
शहरातील आदमपूर बसस्टॉपच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ५५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदिप प्रकाश राजपुत (वय ४०, रा. धनजीनाका, रत्नागिरी) असे संशयितांचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ५) दुपारी साडेबाराच्या सुमारास आदमपूर येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिस मिळाली होता त्यानुसार पोलिसांनी आदमपूर बसस्टॉप येथे कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी साहित्यासह १ हजार ५५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.