
मिस्त्री हायस्कूल येथे ‘वृक्षारोपण’ कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी : शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे वनमहोत्सव विभागामार्फत ‘एक पेड मॉ के नाम’ मोहिमेअंतर्गत शाळेतील Eco Club विभागाच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी Eco Club विभाग प्रमुख सौ. निशात रेहान राजवाडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मुनव्वर फिरोजखान तांबोळी, पर्यवेक्षक श्री. मुश्ताक आगा, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. संजिदा म्हसकर, सौ. कौसरजहाँ फडनाईक, सौ. शाजिया बुडये, श्री. राशिद काद्री, सर्व शिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग आवर्जून उपस्थित होता. मुख्याध्यापिका सौ. मुनव्वर फिरोजखान तांबोळी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. संजिदा म्हसकर यांनी आपल्या मनोगतातून मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व विशद केले.
त्यानंतर उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थी, पर्यवेक्षक, मुख्याध्यापिका व शिक्षक यांच्याहस्ते शालेय परिसरात आंब्याची व बादामची कलमे रोपण करण्यात आली. पर्यवेक्षक श्री. मुश्ताक आगा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व या कार्यक्रमाची सांगता झाली.