महायुतीत प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार; ना. सामंत यांची नाराजी दूर करू : खा. तटकरे
रत्नागिरी:
महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही अजित यशवंतराव यांना पक्षात घेतले. युतीतील अन्य पक्षांनीही याच पद्धतीने पक्षप्रवेश करुन घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीत खालच्या पातUीवर येवून टिका करणार्यांना पक्षात घेतले गेले आहे. त्यांना प्रवेश देताना आम्हाला विचारले का? असा प्रश्न उपस्थित करत अजित यशंवतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुUे ना.सामंत नाराज झाले असतील; ते तर माझेच चेले आहेत, त्यांची शंका दूर करेन असे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी का@ग्रेस पक्षातील लांजा येथिल अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिल्ह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. अजित यशवंतराव यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना नेते तथा पालकमंत्री ना.उदय सामंत नाराज असल्याचे पुढे आले आहे. त्या बाबत बोलताना खा.तटकरे म्हणाले, युतीमध्ये सर्व पक्षांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही आमचा पक्ष वाढविण्याचे काम करत आहोत.पक्षप्रवेश करताना आम्ही कोणाला का विचारायचे? युतीतील इतर पक्षांनी जिल्ह्यात पक्ष प्रवेश करुन घेताना आम्हाला कुठे विचारले होते? विधानसभा निवडणुकीत समोर लढताना ज्यांनी खालच्या पातUीवर जावून टिका केली होती. त्यांनाच सन्मानाने पक्षात घेतले गेले. त्यावर आम्ही काय बोललोय का? असा सवाल खा.सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीतील अंतर्गत वाद सोडविण्यासाठी समन्वय समिती आहे. त्यामध्ये प्रत्येक पक्षांचे महत्वाचे नेते आहेत. ते प्रत्येक गोष्टींवर अंतिम निर्णय घेत असतात. समन्वय समितीमध्ये माPयासह ना. उदय सामंत यांचाही समावेश आहे. बैठीकी वेUी आपण ना.सामंतांशी बोलू असेही खा. तटकरे यांनी सांगितले. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत पक्षाचे प्रमुख नेतेच निर्णय घेतलील. योग्य वेUी योग्य निर्णय होईल असेही खा.तटकरे म्हणाले.
ठाकरे नावाला राज्यात मोठे वलय!
हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन सरकार ब@कफुटवर आले का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खा. तटकरे म्हणाले, सरकार ब@कफुटवर येण्याचा प्रश्न नाही. लोकभावना समजून हा निर्णय घेण्यात आला.दोन्ही ठाकरे एकत्र येणार कि नाहीत हे मी सांगू शकत नाही. तो त्यांचा विषय आहे. मात्र ठाकरे नावाला बाUासाहेब ठाकरे असल्यापासूनच मोठे वलय आहे. राज्यात त्यांचे वलय आहे, हे नाकारुन चालणार नाही असेही खा. तटकरे यांनी सांगितले. या वक्तव्यातून खा. तटकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावल्याची चर्चा सुरु होती.