
लांजा-बाजारपेठे येथे मटका जुगार चालविण्याऱ्या विरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः लांजा -बाजारपेठ येथे बंद टपरीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. लांजा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप जनार्दन बाईत (वय ३६, रा. जाकादेवी मंदिर, लांजा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० जून ला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लांजा बाजारपेठ येथील पेट्रोलपंपाच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगार चालत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे त्यांनी कारवाई केली. कारवाईत संशयिताकडे विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडला. पोलिसांनी त्यांच्याकडून १ हजार ५३० रुपयांची मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार नितीन डोमणे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.