
कडवईत पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत दोस्ती यारी माळवाशी संघ विजेता
संगमेश्वर: तालुक्यातील कडवई येथील मैत्री सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत दोस्ती यारी माळवाशी संघाने विजेतेपद पटकावले.शेवटपर्यंत चुरशीचा झालेला हा सामना दोस्ती यारी संघाने नवयुवक खरशेत बाटलेवाडी संघावर एका गुणाने मात करत जिंकला
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील १६ संघानी सहभाग घेतला.स्पर्धेचा तृतीय क्रमांक स्थानिक संघ मैत्री कडवईने पटकावला तर चतुर्थ क्रमांक नाचरेवाडी आरवली या संघाला प्राप्त झाला.सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार माळवाशी संघाच्या रोशन कांबळे याने पटकावला. बेस्ट रेडर बाटलेवाडी संघाचा अचल बाटले व बेस्ट डिफेंडर माळवाशी संघाचा दिनेश कांबळे ठरला.
या स्पर्धेला सहदेव बेटकर,संतोष थेराडे,चंद्रकांत जाधव,दत्ताराम ओकटे, दत्ताशेठ लाखण, अरविंद जाधव,निलेश कुंभार, डॉ.भगवान नारकर,प्रदीप कानाल,राज बोथरे,प्रमोद कडवईकर या मान्यवरांनी उपस्थिती लावली.तसेच पत्रकार संघाचे मुजीब खान, वहाब दळवी, नियाज खान,दीपक तुळसणकर हे उपस्थित होते.स्पर्धेसाठी सहदेव बेटकर ,संतोष थेराडे,प्रशांत यादव,सुधीर सुर्वे, अरविंद जाधव,चंद्रकांत जाधव, दी एज्युकेशन सोसायटी,कडवई,अमित उजगावकर, शशिकांत घोसाळकर,अक्षय यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महेश जाधव,सचिव मिलिंद कडवईकर,खजिनदार मोहित पंडव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश माने,महेश साळुंके,केतन ओकटे, रुपेश दहिवळकर,विकास धामणाक,सुनील पाचकुडे,सर्वेश सुर्वे,आकाश पाले,दिप्तेश जोशी,यश भडवळकर,आयुष भडवळकर,यश गुरव,राजू चांदे,मंजुश्री कडवईकर,पारस बाईत,साईराज सुर्वे यांनी मेहनत घेतली.संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन सुनिल शिगवण यांनी केले. पंच म्हणून ओंकार पातेरे,मनीष बांडागळे,ओंकार वासकर यांनी काम पाहिले तर संतोष फुटक यांनी वेळाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.