थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेवर ‘जैसे थे’चे आदेश!
रत्नागिरी : थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेसंदर्भात मोठा वाद निर्माण झाल्यानंतर दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. रत्नागिरीतील थिबा राजा कालीन बुध्द विहाराच्या जागेवर होणाऱ्या कम्युनिटी सेंटर विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मा. न्यायमूर्ती श्री. जी. एस. कुलकर्णी आणि मा. अॅड. एम. सेठना यांनी सुनावणी घेत महत्त्वाचे आदेश दिले.
रत्नदीप काशिनाथ कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य शासन व अन्य विरोधकांविरुद्ध याचिका (नं. 5649/2025) दाखल केली होती. या याचिकेवर अॅड. मोहित दळवी यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांना सार्वजनिक हिताशी संबंधित मानत यास जनहित याचिका म्हणून रूपांतर करण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.