
डेरवणमध्ये १९६ गरोदर मातांना जीवनदान
आर्थिकदृष्ट्या दुर्बल माता अन् नवजात बालकांचे सर्व उपचार मोफत
चिपळूण
हे डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल झालेल्या अतिजोखमीच्या १९६ गरोदर ने मातांना जीवनदान मिळाले आहे. गरोदरपणात नानावनोंदणीची मातांना सवय लागावी आणि तात्यांनी स्वतःची योग्य काळजी घ्यावी याकरिता अशा नोंदणीकृत मातांसाठी मोफत बाळंतपण आणि सिझेरियन ऑपरेशनची सुविधा या तरुग्णालयाने उपलब्ध करून दिली आहे.
अद्ययावत रुग्णालय म्हटले की भीती वाटणे, खर्चाची चिंता असणे हा संभ्रम दूर करण्यासाठी न डेरवण रुग्णालय प्रशासनाने गरोदरपणातच नाव र नोंदणी केलेल्या मातांचे डोहाळे जेवण साजरे करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाचे पथक – गावोगावी, घरोघरी भेटी देऊन जोखमीच्या र मातांना शोधून उपचार सुरू करते आणि तिची संपूर्ण जबाबदारी उचलते.
विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात मालवण, रायपाटण, राजापूर, चिपळूण, विजयदुर्ग, कर्नाटक, ढाकमोळी, दापोली, कल्याण, मंडणगड, गोरेगाव, मुंबई, गुहागर, पालघर येथून अत्यवस्थ माता वालावलकर रुग्णालयात दाखल झाल्या. या मातांचे प्राण डॉक्टरांनी वाचवले आहेत. सरकारी रुग्णालयाचे योग्य मार्गदर्शन आणि वेळेत उपचारासाठी दाखल केल्याने हे शक्य झाले असे येथील डॉक्टर सांगतात. अंगणवाडी लिल सेविका, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी यांच्या योग्य समुपदेशनाने ह्या माता वालावलकर रुग्णालयापर्यंत पोहोचू शकल्या. ४२ मातांना जास्त दिवस अतिदक्षता विभागात उपचार करावे लागले. १५ हून अधिक मातांना व्हेंटिलेटरद्वारे श्वास देण्याची वेळ आली होती. १३ जणींना रक्तातील घटक वापरून रक्तस्त्राव बंद करावा लागला. तर एका महिलेला मूत्रपिंड निकामी झाल्याने हिमोडिलायसिसवर ठेवावे लागले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल मातांचे आणि नवजात बालकांचे हे सर्व उपचार मोफत करत अनेक कुटुंबे आनंदी करण्याचे कार्य वालावलकर रुग्णालय सातत्याने करीत आहे.