
दुचाकीची रिक्षाला धडक ; संशयित महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ः शहरातील जयस्तंभ येथे वाहतूक कोंडीमुळे थांबलेल्या रिक्षाला दुचाकीची धडक झाली. स्वतःच्या व रिक्षातील प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ५) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालय ते बसस्थानक जाणाऱ्या रस्त्यावर जयस्तंभ चौकात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला दुचाकी (क्र. एमएच-०८ एए ५१३१) घेऊन जयस्तंभ चौक पार करुन न्यायालयाकडे जात असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून रिक्षा (क्र. एमएच -०८ एक्यू ५४७०) च्या उजव्या बाजूस ठोकर दिल्याने संशयित महिला स्वतःहून डाव्या बाजूला पडल्या. स्वतःच्या दुखापतीस तसेच रिक्षातील प्रवाशांना दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वीर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध शुक्रवारी (ता. ११) दुपारी एक वाजता गुन्हा दाखल केला आहे.
————